योनिशुचितेची उदात्त‘करणी’
कालबाह्य मूल्यंच विवेकाच्या अग्नीत जळोत. कालबाह्य विषयांना सजवून चित्रपट काढणाऱ्यांच्या बुद्धीचा खेद वाटतो. त्याचा राजकीय वापर करणाऱ्यांचा तिटकारा वाटतो आणि आमच्या मातेचा अपमान वगैरे नाटकं करणारांची किव वाटते. शेवटी, कुठल्या नतद्रष्ट विषयावरून आपल्या देशात रणधुमाळी माजते, आणि कुठले सुमार हुतात्मा ठरतात, हे पाहाणं क्लेशकारक आहे.......